Sunday, October 4, 2026
HomeनगरCrime News : घरफोडी करणार्‍या अल्पवयीनसह तिघे पकडले

Crime News : घरफोडी करणार्‍या अल्पवयीनसह तिघे पकडले

13 ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील सर्जेपुरा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत तोफखाना पोलिसांनी 1 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी तयार करण्यात आलेली 13 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड पोलिसांनी हस्तगत केली आहे. सर्जेपुरा येथील मिसाळ गल्ली परिसरात राहणार्‍या स्वाती विशाल घुगरे (वय 34) यांच्या घरातून सुमारे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व कानातील टॉप्स चोरीस गेल्याचे समोर आले होते. त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले.

- Advertisement -

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित करून संशयितांचा शोध सुरू केला. तांत्रिक आणि स्थानिक माहितीच्या आधारे या गुन्ह्यात सिध्दार्थनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच आपल्या दोन साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार पोलिसांनी दुर्गेश चंद्रकांत चिंतामणी (वय 22, रा. दाळमंडई) आणि प्रकाश रावसाहेब उमाप (वय 28, रा. सिध्दार्थनगर) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबूली दिली. पोलिसांनी 13 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...