Thursday, June 13, 2024
Homeनगरनवीन चांदगाव येथे दोन ठिकाणी घरफोडी

नवीन चांदगाव येथे दोन ठिकाणी घरफोडी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील नवीन चांदगाव येथे राहत्या घरासमोरून मोटारसायकल तसेच मेडीकल दुकानातून 55 हजार रुपयांचा ऐवज त्याचबरोबर अन्य एका घरातून 22 हजार रुपये असा 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिल गोरक्षनाथ उंदरे (वय 32) धंदा-मेडिकल दुकान रा. नवीन चांदगाव, उस्थळ दुमाला ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 4 मे रोजी रात्री आमचे घरासमोर मी पार्क केलेली माझी 40 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल (एमएच 17 बीयू 4794) चोरीस गेली.

त्याचबरोबर आमचे घरासमोरील पत्नी दिपालीच्या मेडिकलच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून मेडिकल मधील 40 हजार रुपये किमतीच्या कॉस्मेटिक वस्तू (बॉडी स्प्रे, फेसवॉश, क्रिम वगैरे) तसेच 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. माझे घराशेजारी राहाण्यास असणारे एकनाथ गंगाधर लेंडाळ (वय 81) यांचे घरातील 22 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे समजले. दोन्ही चोरीच्या घटना मिळून 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांवर भारतीय दंड विधान कलम 457, 379, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या