Tuesday, March 25, 2025
Homeनगरघरफोडी करणारी महिला अटकेत

घरफोडी करणारी महिला अटकेत

4 लाख 89 हजार 833 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावात घरफोडी करणारी महिलेला श्रीगोंदा पोलिसांनी 12 तासात ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून 4 लाख 89 हजार 833 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिला न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि.28) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली मिळाली आहे.

- Advertisement -

मिरा शांताराम काळे (रा. काळे वस्ती, आढळगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुभद्रा शिंदे (वय 65, रा. आढळगाव ता. श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरीची अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली होती. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा मिरा काळे या महिलेने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने महिलेचा शोध घेत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरी केलेला 4 लाख 89 हजार 833 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, आप्पासाहेब तरटे, गोकुळ इंगवले, संदिप राऊत, सचिन वारे, संदिप आजबे, संदिप शिरसाठ, आनंद मैड, महिला कर्मचारी आस्मिता शेळके यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...