Friday, May 3, 2024
Homeनाशिकपेठ : वाजवड येथे आगीत भात पिकाचे नुकसान

पेठ : वाजवड येथे आगीत भात पिकाचे नुकसान

पेठ | Peth

तालुक्यातील वाजवड येथील भाताची कापणी करून रचून ठेवण्यात आलेल्या पिकाला आग लावण्यात आल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

दरम्यान भात पिकाची कापणी झाल्यानंतर ते पीक शेतकरी रचून ठेवत असतात. त्याला ग्रामीण भाषेत उडवे म्हटले जाते. (दि.३०) शुकवार रोजी वाजवड येथील नामदेव गोविंद दाहवाड व रामदास लासू गोबाले यांच्या शेतातील रचून ठेवलेल्या उडव्यांना अज्ञाताने पेटवून दिल्याने उडवे जळून खाक झाले.

या प्रकरणी तलाठी वाकतकर यांनी पंचनामा केला असुन दाहवाड यांचे ५० ते ६० हजाराचे तर गोबाले यांचे ३० हजाराचे नुकसान झाल्याचे अहवाल तहसिलदारांना देण्यात आले.

या घटनेबाबत परिसरात संतापाचे वातावरण आहे. अज्ञात व्यक्ती वर कारवाई करण्याची शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या