Wednesday, October 30, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पुन्हा एकदा बसचा विचित्र अपघात

नाशकात पुन्हा एकदा बसचा विचित्र अपघात

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) एका बसला अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

शिखरेवाडी परिसरातील पासपोर्ट ऑफीसच्या समोर शिवशाही क्र. एमएच 09 ईएम 1297 या बसने रिक्षा क्र. एम एच 15 एफ यू 8389 ला पाठीमागून धडक दिली व बस विद्युत खांबाला जाऊन आदळली. यात रिक्षातील तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याचे समजते. बसने धडक दिल्यामुळे विद्युत खांब पूर्ण वाकला आहे.

सलमान खानचे गॅलक्सी अपार्टमेंट असुरक्षित; वाचा नेमकं काय घडलं?

ही घटना मनसेचे नाशिकरोड विभागीय अध्यक्ष विक्रम कदम यांना समजता च त्यांनी तातडीने धाव घेऊन मदत केली व वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती त्याचप्रमाणे सदरची घटना समजल्यानंतर तातडीने उपनगर पोलीस व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदत कार्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजप आमदाराची मागणी अन् शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंचवटीतील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरचीसमोरील सिग्नलवर पहाटे पाच वाजता यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस आणि अमृतधामकडून नाशिकरोडकडे जाणारा कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतला. या आगीत बारा प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले, तर उर्वरित प्रवासी जखमी झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या