Tuesday, October 6, 2026
Homeक्राईमएसटी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

एसटी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

देवळा |प्रतिनिधी
विंचूर – प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जीवर रामेश्वर(वरचा) फाट्याजवळ गुरुवारी, दिनांक १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने पूण्याहून सटाण्याकडे जाणाऱ्या साटाणा आगाराच्या पूणे – सटाणा एसटी बस (क्रमांक एम. एच. १४, एल. एक्स. ७८५१) व पुढे चालणारी दुचाकी (क्रमांक एम. एच. १७, ए. वाय. २३४१) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरी तीघांचा बसच्या चाकाखाली आल्याने अक्षरशः चेंदा मेंदा झाला.

अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिकक्ष सार्थक नेहेते व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व नागरिकांच्या मदतीने अपघातातील मृतांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

स्फोटकांचा संशय; मालेगावात एटीएसची कारवाई, मशिदीसह घरांची झडती

दरम्यान रात्री उशीरा दुचाकी वरील तिघांची ओळख पटवण्यात आली. मृतांची नावे अशी, अंबादास एकनाथ कुंवर, रा. आंजग ता. मालेगाव, मोहन प्रकाश वाघ, राबेज. ता. कळवण, व भरत फकिरा पवार, रा. सोमपूर ता. सटाणा, ते भऊर येथे कामाला असल्याचे प्रथमदर्शनी समजते.

अपघात प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरिकक्ष सार्थक नेहेते व सहकारी करित आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...