Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेशAccident News : स्कूल बसला भरधाव कारची धडक, भीषण अपघातात ६ जणांचा...

Accident News : स्कूल बसला भरधाव कारची धडक, भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

दिल्ली | Delhi

गाझियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात ८ वर्षांचा एक चिमुरड्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून (Uttar Pradesh Police) सुरु आहे.

- Advertisement -

Accident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवर स्कूल बस सकाळी चुकीच्या दिशेने येत असताना कारला धडकली. यावेळी स्कूल बसमध्ये एकही शाळकरी मुलगा नव्हता. त्यात फक्त बस चालक होता. यामुळे मोठी हानी टळली. मात्र, या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून तपास व मदतकार्य सुरू आहे. तसेच, स्कूल बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये आज प्रवासी बसला भीषण अपघात झाला. ही बस पुलावरुन थेट कालव्यात कोसळली. या अपघातामध्ये बसमधील सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्री… मग गावातही दोन उपसरपंच करा; पठ्ठ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या