नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे. या अपघातानंतर परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकूण १८-२० प्रवासी प्रवास करत होते. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यामध्ये ८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
या अपघाताबाबत माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले की, अपघात बद्रीनाथ महामार्गावर घडला आहे. घोलतीरजवळ बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. यामुळे प्रवाशांचा ट्रेम्पो हा थेट अलकनंदा नदीत कोसळला. टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा अपघात झाला ज्यात ही गाडी प्रवाशांना घेऊन जात होती. तसेच या गाडीमधून १८ ते २० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, आतापर्यंत पाच ते सात प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागला आहे.
डोंगर भागात पडलेल्या पावसामुळे नदीचा प्रवास देखील प्रचंड वेगवान आहे. यामधील काही प्रवासी बसमधून खाली पडले. सध्या त्यांचा शोध सुरु आहे. नदीचा प्रवाह सध्या जास्त असल्यामुळे बचाव कार्य करण्यात अनेक अडचणी येत आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते. त्यांनी देखील कोणत्याही मदतीची वाट न पाहता बचाव कार्याला सुरुवात केली.
बसचा अपघात कसा झाला?
समोर आलेल्या माहितीनुसार १८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचे पथक या ठिकाणी आले. UK 08, PA 7444 या बसचा अपघात झाला आहे. या बसमध्ये चालकासह एकूण २० जण बसलेले होते. या बसमध्ये उदयपूर (राजस्थान) आणि गुजरात येथील सोनी परिवार चारधाम यात्रेसाठी आला होता. याच बसचा अपघात झाला आहे.
या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. सध्या त्यांचा शोध सुरु आहे. त्याठिकाणी झालेल्या पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सध्या अनेक टीम तिथे दाखल झाल्या आहेत. जिथे अपघात झाला ते ठिकाण खूपच दुर्गम आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




