Monday, June 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजबस टँकरवर धडकली; सत्तावीस प्रवासी जखमी

बस टँकरवर धडकली; सत्तावीस प्रवासी जखमी

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

- Advertisement -

आज रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पिंपळगाव बसवंत येथील पीएनजी टोल प्लाझा येथे लेनमध्ये उभ्या असलेल्या टँकर क्रमांक एमएच २९सी वाय ९३४० वर चाळीसगाव हून कल्याण कडे जाणारी प्रवासी एसटी बस क्रमांक एम एच ४० एन९८१७ जाऊन आदळली. या अपघातात बसमधील सत्तावीस प्रवासी जखमी झाले.

टोल प्लाझावर लेनमध्ये रांगेत गाडी उभी करताना बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे कळते. जखमी प्रवाशांना पिंपळगाव बसवंत येथील ओम हॉस्पिटल आणि धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी आपल्या सहकार्यांच्या सहकार्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.अपघाताचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

या अपघातातील जखमींंची नावे
1संगीता बारहाडे वय 40 ,
2निकिता झायडे वय 24 ,
3गोपाळ खैरनार 70,
4योगेश खैरनार वय 70
5प्रदीप खैरनार वय 52 मालेगाव,
6हितेश अहिरे वय १५,
7संतोष पांडे, नाशिक,
8गफार शेख वय 40 ,
9रजिया शेख वय 10,
10वैभव कर्नाटक 21 नाशिक,
11राजेंद्र पाटील ,वय,57,
12तुषार महाजन वय 41 चाळीसगाव,
13मंगलबाई रावले वय 45
14कोमल भास्कर वय 24
15सुरेखा येवले वय50 ,
16लक्ष्मण बाविस्कर वय 74
17प्रकाश अमृतकर वय 63
18विमलबाई वाणी वय ७४
19गायत्री बैरागी वय 18
20संध्या बैरागी वय 39
21भूमी बैरागी वय १३
22पूजा बैरागी,वय २०
23मानिका पवार वय 45
24गणेश निकम वय 57
25प्रशांत निकम वय 40
26जयश्री निकम 35
27अविनाश राठोड.

- Advertisment -

ताज्या बातम्या