Monday, July 22, 2024
Homeनगरतालुक्याच्या ठिकाणी बससेवा नसल्यामुळे चांगदेवनगरचे ग्रामस्थ त्रस्त

तालुक्याच्या ठिकाणी बससेवा नसल्यामुळे चांगदेवनगरचे ग्रामस्थ त्रस्त

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

- Advertisement -

पुणतांबा परिसरातील चांगदेवनगर येथील ग्रामस्थांना राहाता येथे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अद्यापही थेट बससेवा नसल्यामुळे चांगदेवनगर येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.

राहाता तालुक्याची 26 जून 1999 रोजी निर्मिती झाल्यानंतर पुणतांबा परिसराचा समावेश राहाता तालुक्यात करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या 23 वर्षापासून पुणतांबा येथून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट बससेवा नाही. परिसरातील ग्रामस्थांची तहसील कचेरीत अनेक कामे असतात. ही कामे करण्यासाठी ग्रामस्थांना शिर्डीमार्गे किंवा खैरी निमगाव मार्गे जावे लागते. हे अत्यंत गैरसोयीचे व खर्चिक आहे. त्यामुळे कचेरीतील कामे करण्यासाठी बर्‍याच वेळा दलालांची मदत घ्यावी लागते.

विशेष म्हणजे कोपरगाव, श्रीरामपूर तसेच वैजापूर आगाराच्या चांगदेवनगर मार्गे असलेल्या बससेवा गेल्या काही महिन्यापासून बंद झालेल्या आहे. त्यामुळे चांगदेवनगर परिसरातील प्रवाशीवर्ग तसेच विद्यार्थ्यांना श्रीरामपूर व कोपरगावला जाण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही चांगदेवनगर मार्गे बससेवा सुरु होत नाही तसेच पुणतांबा-राहाता थेट बससेवेकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी चांगदेवनगर येथील ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाच्यावतीने थेट आंदोलन करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सांबारे, बाळासाहेब जाधव व राजेंद्र गुंजाळ यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या