Thursday, February 12, 2026
HomeनगरCrime News : बसस्थानक परिसरात अश्लील कृत्ये; 11 महिलांवर कारवाई

Crime News : बसस्थानक परिसरात अश्लील कृत्ये; 11 महिलांवर कारवाई

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला उभे राहून ये-जा करणार्‍या नागरिकांकडे अश्लील हावभाव करणे व अश्लील गाणी म्हणत सार्वजनिक वातावरण दूषित केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 11 महिलांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (10 फेब्रुवारी) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार शहरात गस्त सुरू होते. दरम्यान, माळीवाडा बसस्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांकडे अश्लील हावभाव करत असल्याची व अश्लील गाणी म्हणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी धाव घेत खात्री केली असता काही महिला अश्लील कृत्य करताना आढळून आल्या.

YouTube video player

पोलिसांनी घटनास्थळीच 11 महिलांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात महिला सहायक निरीक्षक तेजश्री थोरात, महिला उपनिरीक्षक शितल मुगडे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार संतोष बनकर, विशाल दळवी, विनोद बोरगे, विजय ठोंबरे, पल्लवी रोहेकले, वर्षा पंडित, दिख्खत, अभय कदम, दीपक रोहकले, दत्तात्रय कोतकर, सुरज कदम, सत्यम शिंदे, रमेश शिंदे व सोमनाथ राऊत यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जेऊरमध्ये सौर प्रकल्पावरून संतापाचा उद्रेक

0
अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar नगर तालुक्यातील जेऊर येथील घुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम नियोजनाअभावी व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला...