Saturday, July 27, 2024
Homeनगरव्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक

व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गाळे खरेदीपोटी दिलेले 40 लाखाचे चेक बँकेत वटले नाही तसेच खरेदीची ठरलेली रक्कमही देण्यास टाळाटाळ करणार्‍या मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव) याच्या विरोधात रविवारी (दि. 24) कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सिमरण गुरूजित सिंग (वय 27 रा. कंदरनगर, ताराकपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादी सिमरण सिंग यांचे चुलते कवलजितसिंग भगतसिंग गंभीर यांनी सावेडी उपनगरातील कोहिनूर वैभव अपार्टमेंटमधील आठ गाळे 45 लाख रूपयांना 9 एप्रिल 2018 रोजी मनोज मोतियानी यास खरेदीखत करून दिले होते. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक कार्यालय, पराग बिल्डींग येथे झाले होते. गाळे खरेदीपोटी मोतीयानी याने गंभीर यांना 45 लाख रूपये रकमेचे चेक दिले होते. मोतीयानी हा गंभीर यांना चेक आज भरू नका, 15 दिवसांनी भरा, 20 दिवसांनी भरा, खात्यात पैसे शिल्लक नाही, असे म्हणत होता.

चेकची मुदत उलटून गेल्यानंतर मोतीयानी याने त्याच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या सावेडी शाखेतील 20 लाखाचे दोन चेक 23 मार्च 2021 रोजी दिले. सदरचे चेक बँकेत भरल्यानंतर वटतील, असेही मोतीयानी याने सांगितले होते. दरम्यान, ते चेक एचडीएफसी बँकेच्या सावेडी शाखेत वटविण्याकरीता दिले असता ते 21 मे 2021 रोजी न वटता परत आले. मोतीयानी याने विश्वासघात करून फसवणूक केल्याचे लक्ष्यात आल्यानंतर त्याच्या विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला होता. तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर मोतीयानी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या