Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमप्लॉटच्या व्यवहारातून उद्योजकाचे अपहरण करून मारहाण

प्लॉटच्या व्यवहारातून उद्योजकाचे अपहरण करून मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

प्लॉटच्या व्यवहारातून एका उद्योजकाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसी परिसरात घडली. महेश सुरेश गावडे (वय 30 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे त्या उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून निखिल राजकुमार लून (रा. नवजीवन कॉलनी, मार्केटयार्ड जवळ, अहिल्यानगर) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश यांची एमआयडीसीमध्ये शिवशक्ती एंटरप्राईजेस कंपनी आहे. कंपनीच्या कामाकरिता त्यांनी निखिलकडून 2021 मध्ये 10 लाख रुपये घेऊन त्या बदल्यात स्वत:च्या नावावर असलेल्या प्लॉटचे साठेखत करून दिले होते.

- Advertisement -

त्यानंतर दोन वर्षात महेश यांनी संपूर्ण पैसे व्याजासह परत करून हा सर्व व्यवहार मिटवून टाकला होता. मात्र त्यानंतरही निखिल त्याच्या नावावर असलेला साठेखत केलेला प्लॉटचा व्यवहार रद्द करण्यास टाळाटाळ करत होता. म्हणून महेश यांनी याप्रकरणी कोर्टात दावा दाखल केला होता. मात्र तरीही निखिल हा वेळोवेळी महेश यांना दमदाटी करून प्लॉट माझ्या नावावर करून दे असे धमकावत होता. मंगळवारी महेश आणि त्यांचे मित्र निंबळककडे जात असताना निखिलने एका चारचाकीतून येऊन महेश यांच्या दुचाकीला चारचाकी आडवी लावली. खाली उतरून आजच्या आजच मला प्लॉटची खरेदी करून दे व माझ्या विरूध्द कोर्टात व उपनिबंधक कार्यालयात दिलेली तक्रार मागे घे नाहीतर तुला आज जिवंत सोडणार नाही, तुझा काटाच काढतो, असे म्हणत महेश यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यांचे निखिलने चारचाकीतून अपहरण करत स्वतःच्या ऑफिसवर नेऊन मारहाण केली. महेश यांना बळजबरीने पुन्हा दुसर्‍या एका वाहनात बसवून खरेदीखत करून घेण्यासाठी वाहन उपनिबंधक कार्यालयाकडे घेऊन जात असताना मनमाड रस्त्यावर हॉटेल चैतन्य क्लासिक जवळ वाहनाचा वेग कमी झाल्याने महेश यांना त्यांचे मित्र रस्त्यावरून जाताना दिसले. त्यावेळी महेश यांनी मोठमोठ्याने आवाज देऊन त्यांच्या मित्रांना बोलवून घेतले त्या ठिकाणी वाहन हळू झाल्यामुळे महेश यांच्या मित्रांनी वाहनाचा दरवाजा उघडला व महेश यांची सुटका केली. निखिल घटनास्थळावरून पसार झाला. जखमी महेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...