Monday, July 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly By-Elections : सात राज्यांतील विधानसभेच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

Assembly By-Elections : सात राज्यांतील विधानसभेच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

'या' तारखेला होणार मतदान

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नुकतीच लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) संपली असून देशात नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्त्वात एनडीए आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे देशात मोदी सरकार ३.० हे नवे पर्व सुरु झाले आहे. मात्र, अशातच आज सोमवारी निवडणूक आयोगाने देशातील ७ राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकींचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत.

निवडणूक आयोगाने (Election Commission) बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यांमधील रिक्त असलेल्या १३ विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक (By-Elections) जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी १० जुलैला मतदान होणार असून १३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. तर १४ जून रोजी या जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जून असून २४ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.

दरम्यान, पोटनिवडणुक होणाऱ्या राज्यांमध्ये बिहारमधील (Bihar) एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे. तर पश्चिम बंगालमधील ४, तामिळनाडूतील १, मध्य प्रदेशातील १, उत्तराखंडमधील २, पंजाबमधील १ आणि हिमाचलमधील ३ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या