Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यावर्चस्वासाठी राजकीय फड रंगणार

वर्चस्वासाठी राजकीय फड रंगणार

नरेंद्र जोशी

नाशिक | Nashik

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतीत निवडणुकीचा धुरळा उडण्यास आता सुरवात झाली आहे. १४९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक होेत आहे. इगतपुरी, मालेगाव, दिंडोरी, येवला, कळवण, निफाड, त्र्यंबकेश्वर , देवळा, बागलाण, नाशिक या तालुक्यात निवडणुकीचा बार उडणार आहे. या शिवाय जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, येवला, पेठ तालुक्यात थेट सरपंचपदासाठी निवडणूक रंगणार आहे. १५ तालुक्यात पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीवरील वर्चस्वासाठी राजकीय फड चांंगलाच रंगणार आहे.

आज जिल्ह्यातील स्थानीक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी राजकारण्यांना सध्या फारसे काम नाही. प्रशासक राजवट असल्याने अधीकाऱ्यांवर फारसा वचक राहीलेला नाही. त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे. वर्षानुवर्ष नुसतं पदे भोगत राहायचं हा काही जणांंचा धंदा झाला आहे. निवडणुका आल्या की, मैदानात उतरतात. असंं राजकारणात केलं जात की, आमच्या शिवाय पर्याय नही. मात्र यंदा गावातील सर्व लोकांनी एकत्रीत येवून त्याबाबत जाब विचारला तर नक्कीच परिर्वतन झाल्याशिवाय राहणार नाही.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून राजकीय पिढ्या घडत असतात. चांगली ग्रामपंंचायत चालवली की, पुढचं राजकारण चांगलं करता येतं. राज्यातील अनेक बडे राजकीय नेते ग्रामपंचायतीतून मोठे झालेले आहेत. ग्रामपंचायतीचा अनुभव असलेल्या नेत्यांना चांगलं राजकीय ज्ञान असतं. योजनेची माहित चटकन समजते. काही राजकीय मंडळी जि.प., प.स.च्या निवडणुकी ऐवजी ग्रामपंचयतीचं सरपंच होणं पसंद करतात. सरपंच होणं मोठी प्रतिष्ठा आहे.

निवडणुकीत वाद, विवाद ठरलेले असतात. सख्ये पक्के वैरी होतात. घरा, घरात राजकारणाच्या ठिणग्या पडतात. काही ठिकाणी एकाच कुटूंबात दोन पॅनल पडतात. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त भांडणे होतात. काही गावात हिंसक वळण लागतें. ग्रा.प. निवडणुकीवरुन कित्येकांचे रक्ताचे नाते दुरावले जाते. काही जण मतदान टाकले नाही म्हणुन आपल्या सग्या, सोयऱ्यांच्या लग्नात जात नाही. राजकारणात मनाचा मोठेपणा असावा लागतो. ज्यांच्या जवळ मोठेपण, विचार आहे तेच माणसं राजकारणात यशस्वी होतो.

बडया राजकरणी मंडळीत कधीच कटूता नसते. असतो त्यांचा फक्त वैचारीक वाद, वैचारीकपणा जिवंत ठेवून एकमेकांमधील मतभेद विसरुन गावाचं गावपण कायम जिवंत ठेवण्याचं काम गावकऱ्यांनी केले पाहिजे. निवडणुका येताता, जातात, निवडणूकीवरुन रक्तपात, वाद, धार्मिक तेढ निर्माण क रु नये. एकीतून बरचं काही निर्माण करता येतं. निवडणुका झाल्यानंतर आपल्यातील वाद मिटून एकोप्याने सर्व गावकर्यांनी काम केले तर नक्कीच परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही.

किती जणांचे किंवा समाजातील किती विभिन्न गटांचे हितसंबंध साधण्याचे प्रयत्न राजकारणाद्वारे शक्य होतात. जेव्हा एकाच नेत्याचे किंवा समूहाचे हित साधले जात असते, तेव्हा ते राजकारण ‘संकुचित’ असते.

पण कुटुंब, गाव, जात, अशा थेट आपल्याशी संबंधित चौकटींच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण समाज किंवा स्वजनांच्याखेरीजचे इतरेजन यांच्या हिताची चर्चा करायला लागतो, तेव्हा स्वार्थ आणि परमार्थ यांची आपोआप सांगड घातली जाऊ लागते. स्वार्थ किंवा ‘आपला हितसंबंध’ ही कल्पना सतत विस्तारत नेणे किंवा तिची व्याप्ती वाढवणे हे राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.यदाच्या निवडणुकीत सार्वजनीक हिताला प्राधान्य द्यायला हवे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या