Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik Political: गेल्या वेळेपेक्षा भरपूर मताधिक्य देऊ

Nashik Political: गेल्या वेळेपेक्षा भरपूर मताधिक्य देऊ

मखमलाबाद प्रचार कार्यालय उद्घाटनप्रसंगी तानाजी पिंगळे यांचे आश्वासन

पंचवटी | प्रतिनिधी
आमदार ॲड. राहुल ढिकले यांना मखमलाबाद ग्रामस्थांनी १५ वर्षापूर्वीच ताब्यात घेतलें आहे. त्यांना गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा भरपूर मताधिक्य देऊन त्यांना पुन्हा आमदार करू, असे आश्वासन सेंट्रल गोदावरी संस्थेचे संचालक तानाजी पिंगळे यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाच्या उ‌द्घाटनप्रसंगी पिंगळे बोलत होते. यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात स्वागत करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तानाजी पिंगळे, संपत तात्या पिंगळे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रचार कार्यालयाच्या उ‌द्घाटनानंतर मखमलाबाद गाव आणि परिसरातून रॅली काढण्यात आली.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Political: भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिकसाठी परिवर्तन घडवा; वसंत गिते यांचे आवाहन

तानाजी पिंगळे, शंकरराव पिंगळे, सुनील के दार, वाळू काकड, माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे, माजी नगरसेविका सुनिता पिंगळे रमेश बाबा काकड, मदनशेठ, पिंगळे, गणपत काकड, भास्कर पिंगळे संजय गामणे, राका माळी, अजित ताडगे, माजी नगरसेवक उद्धव निमसे, नारायणराव काकड, धनंजय खोडे, शिवाजी काकड, उत्तम उगले, संतू काकड, बाळासाहेब पिंगळे, गणेश पिंगळे, ज्ञानेश्वर काकड, राजेश पिंगळे, प्रभाकर पिंगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

यावेळी सुभाष तिडके यांनी मखमलाबाद गावात भारतीय जनता पक्षाची पहिली भाजप शाखा मी सुरू केली असल्याचे सांगितले. तर आमदार अँड. राहुल ढिकले यांचा भावी आमदार अन् मंत्री असा उल्लेख करून ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेऊन ॲड. ढिकले यांना विधानसभेत पुन्हा पाठवा असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस शंकरराव पिंगळे पूर्व विधानसभा मतदारसंघाला सुसंस्कृत असे नेतृत्व मिळाले आहे. त्यांची पाच वर्षातील काम बघा त्यांनी काम करताना कुठलीही हयगय केली नाही.

पंचवटीची मोठी ओळख निर्माण केली आहे. पंचवटी ही प्रभू श्रीरामाची भूमी असून नाशिकचे नाव आज आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी देशात उज्ज्वल केलें आहे. अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठीवर थाप मारली. गेले दोन तीन महिने ज्येष्ठांचा देखील सन्मान करून आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे यावेळी मखमलाबाद गावातून आघाडी देऊ असे सांगितले.

उद्धव निमसे यांनी एका बाजूला शेतकरी हित जपणारा माणूस अन् दुसऱ्या बाजूला शेतकरी विरोधी माणूस आहे. विरोधी उमेदवाराने केवळ ठराविक बिल्डरचाच विकास केला असू केवळ बिल्डर धार्जिण्या व्यक्तीला निवडून देणार का असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा अँड. ढिकले यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन केले. व्ही. एन. नाईक. शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायणराव काकड यांनी गेल्या वेळ पेक्षा जास्त मखमलाबाद ग्रामस्थ लीड देतील असे आश्वासन दिले.

आज मखमलाबाद ग्रामस्थ इतक्या मोठ्या संख्येने आल्याचे बघून खरोखर समाधान वाटले, असे आमदार ॲड. राहुल ढिकले म्हणाले. माझे पाच वर्षाच प्रगती पुस्तक तुमच्यासमोर ठेवले आहे. मी कधी जात पात बघून राजकारण केलं नाही की कोणाला फसवले नाही. गावातील डीपी प्लॅनला सगळ्या मखमलाबाद ग्रामस्थांना घेऊन विरोध केला. शेतकरी सोडून इतरांना पैसे दिले जात आहेत, पेठरोड रस्ता काँक्रिटीकरणासाठी विधानसभेत आवाज उठवला आणि काम मंजूर करून काम देखील सुरू केले आहे.

आज मितिस निम्म्याच्या वर रस्त्याचे काम झाले आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट येते तेव्हा मी पुढे असतो असे सांगितले. मी गेल्या पाच वर्षात जवळपास ९० टक्के पूर्व विधानसभा मतदारसंघ फिरलो आहे. समोरचा उमेदवार केवळ २० दिवसांत कोणत्या बळावर उभा राहतो, असा प्रश्न पडतो. जातीवाद भविष्यासाठी घातक आहे असे सांगत मागच्या वेळचे उमेदवार समाजकारणातील होते. त्यामुळे मला मखमलाबाद गावातून मतदान कमी मिळाले. परंतु यावेळी उमेदवार देताना पवार चुकले आहेत. त्यामुळे निवडून आल्यानंतर सर्वात आधी मखमलाबादमधील सर्व कामे पूर्ण होतील, असे आश्वासन ॲड. ढिकले यांनी दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या