Tuesday, December 3, 2024
HomeनाशिकNashik Political: भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिकसाठी परिवर्तन घडवा; वसंत गिते यांचे आवाहन

Nashik Political: भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिकसाठी परिवर्तन घडवा; वसंत गिते यांचे आवाहन

ज्येष्ठांकडून विजयासाठी आशीर्वाद

नाशिक | प्रतिनिधी
भाविकांचे शहर, यंत्रभूमी, शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची गेल्या १० वर्षात वाट लागली आहे. गुन्हेगारी, ड्रग्जचा विळखा, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, जीवघेणी वाहतूक यामुळे नाशिककर संकटात आहे. या संकटातून आपल्या नबीन पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिकसाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा व आपल्याला विजयासाठी आशीर्वाद द्यावा, असे कळकळीचे आवाहन शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत गिते यांनी केले.

इंदिरानगरमधील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदार संघातील विजयासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वसंत गिते यांना आशीर्वाद दिला. गिते म्हणाले की, शहराची गेल्या १० वर्षात विविध क्षेत्रात घसरण झाली आहे. केंद्र, राज्य तसेच महापालिका असे ट्रीपल इंजिनचे सरकार असणाऱ्या लोकप्रतिनिधीला गेल्या १० वर्षात एकहीप्रकल्प शहरात आणता आला नाही.

- Advertisement -

त्यामुळे नाशिककरांना यंदा बदल हवा आहे. हा बदल घडवण्यासाठी शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दिली असून मध्य नाशिकच्या विकास व सुरक्षेसाठी आपण पुन्हा एकदा सज्ज असल्याचे माजी आमदार वसंत गिते यांनी नमूद केले.

याप्रसंगी कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वासुदेव पांडे तसेच श्रीपाद कुलकर्णी, दिनकर कुलकर्णी, जयवंत मोरे, दत्तात्रय जोशी, प्रदीप कुलकर्णी, विनायक ठोंबरे, विनायक पुरोहित, आनंद तडवळकर, यशवंत वडगांवकर, श्रीकांत वडाळकर, शरद तिळवणकर, दिलीप इनामदार, श्रीमती सुवर्णा बालटे, जयश्री कुलकर्णी, तसेच ज्येष्ठ नागरिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

नाशिक शहरात ड्रग्जचा सर्वाधिक विळखा इंदिरानगर, वडाळा गाव या परिसराला बसला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्यांनीच हे संकट पोसले. त्यामुळे तरुणाई ड्रग्जच्या आहारी जात आहे. आपली नवीन पिढी व शहर वाचवायचे असेल तर ज्येष्ठ नागरिकांनी सजगतेने पुढाकार घ्यायची नितांत गरज आहे. नाशिकला भयमुक्त व ड्रग्ज मुक्त करण्यासाठी मतदानाद्वारे परिवर्तन घडवा, असे आवाहन गिते यांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या