Saturday, July 27, 2024
Homeनाशिकशिधापत्रिकांसाठी दर आठवड्यात 'या' दिवशी' होणार शिबीराचे आयोजन

शिधापत्रिकांसाठी दर आठवड्यात ‘या’ दिवशी’ होणार शिबीराचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नागरिकांच्या शिधापत्रिका (ration card) संबधित कामकाजाचा तत्काळ निपटारा होण्यासाठी 8 मार्चपासून

- Advertisement -

दर बुधवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धान्य वितरण अधिकारी कार्यालयात (Offices of Grain Distribution Officer) शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्यक्ष लाभार्थ्यांनी शिबीरात सहभागी होऊन आपले शिधापत्रिकेंबाबत काम शासकीय दराने पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन नाशिकचे धान्य वितरण अधिकारी नितीन गर्जे (Grain Distribution Officer Nitin Garje) यांनी केले आहे.

धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे शिधापत्रिकेसबंधी अर्ज केल्यास नवीन व विभक्त केशरी शिधापत्रिकेसाठी रूपये 20, पिवळ्या शिधापत्रिकेसाठी रूपये 10 तर शुभ्र शिधापत्रिकेसाठी रुपये 50 तर दुय्यम केशरी शिधापत्रिकेसाठी रूपये 40, दुय्यम पिवळ्या शिधापत्रिकेसाठी रूपये 20 आणि दुय्यम शुभ्र शिधापत्रिकेसाठी रूपये 100 रुपये प्रमाणे नियमानुसार फी आकारली जाते.

तसेच शिधापत्रिकेतुन नाव कमी किंवा समाविष्ट करण्यासाठी अर्ज केल्यास ते काम विनामुल्य करण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता दलालांमार्फत प्रकरणे पाठविण्याची आवश्यकता नसून अर्जदाराने प्रत्यक्ष स्वत:च्या नावाने अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयास दिल्यास विहीत मुदतीत त्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही धान्य वितरण अधिकारी गर्जे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या