Thursday, May 23, 2024
Homeमुख्य बातम्याकफ सिरप कंपन्यांच्या तपासणीसाठी मोहीम राबवा

कफ सिरप कंपन्यांच्या तपासणीसाठी मोहीम राबवा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यात लिक्विड ओरल (कफ सिरप) उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश विधानसभा (Assembly) तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी शुक्रवारी दिले. औषधांची गुणवत्ता तपासण्याला अन्न आणि औषध प्रशासनामार्फत (Food and Drug Administration) प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या…

- Advertisement -

भाजप आमदार आशीष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे निर्यात झालेल्या सदोष कफ सिरप (Cough syrup) मधील हानिकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

कळवणच्या कन्येची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारली मुख्य भूमिका

राज्यातील २०० औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणारी दोन हजारपेक्षा अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी २०२३ मध्ये आढळून आले. त्यामुळे राज्यातील या २०० औषध उत्पादकांची चौकशी करून परवाने रद्द करावेत, अशी मागणी शेलार यांनी केली.

राज्यात शिक्षक भरतीची बंपर लॉटरी; लवकरच ३० हजार पदांची भरती

लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना यांनी झांबिया (Zambia) मधील ६६ मुलांचा मृत्यू सदोष कफ सिरपमधील घटकद्रव्यांमुळे झाल्याची शक्यता वर्तविली होती.

यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने ७ ऑक्टोबर २०२२ रोजी परिपत्रक काढून राज्यातील लिक्विड ओरल उत्पादकांची तपासणी केली. यामध्ये राज्यातील एकूण ८४ उत्पादकांची तपासणी करण्यात आली असून १७ उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर चार उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज्यात ९९६ ॲअ‍ॅ‍ॅलोपॅथिक ( Allopathic) उत्पादक असून त्यापैकी ५१४ उत्पादक निर्यात करतात. राज्यात एकूण १०८ कफसिरप उत्पादक असून ८४ प्रकरणी विशेष मोहीम राबवून तपासणी केली. यापैकी १७ प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चार उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ; तर ५६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या