लोणी |वार्ताहर| Loni
मध्यरात्रीच्या वेळी राहाता (Rahata) तालुक्यातील बाभळेश्वर (Babhleshwar) येथे संशयितरित्या आढळलेल्या परप्रांतीय इसमाकडून लोणी पोलिसांनी (Loni Police) पाच किलो गांजा (Cannabis) पकडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. लोणीचे सपोनि कैलास वाघ आपल्या सहकारी कर्मचार्यांसोबत पेट्रोलिंग करीत असताना बाभळेश्वर येथील सोहेल ऑटो हायटेक सर्व्हिसेस समोर एक इसम मध्यरात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याची विचारपूस केली.
मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासमोर नेल्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमधील एका पॅकेटमध्ये पाच किलो गांजा (Cannabis) आढळून आला. सदर इसमाचे नाव साबीर रमजान शेख, रा. बुर्हाणपूर, मध्य प्रदेश असल्याची माहिती त्याने दिली. लोणी पोलिसांनी (Loni Police) त्याच्या विरुद्ध गुन्हा रजि. नं.॥ 713/2024 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारास परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 4 (उ) 20 (इ) प्रमाणे दाखल करून त्याला राहाता न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली.