पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
चेकेवाडी येथील भिमराज दत्तू चेके या व्यक्तीच्या राहत्या घरातून आणि शिवारातील शेतातून पोलिसांनी (Police) संयुक्त कारवाईत सुमारे 1 लाख 90 हजार 560 रुपये किंमतीचा गांजा जप्त (Cannabis Seized) केला आहे. पाथर्डी पोलीस ठाण्याचे (Pathardi Police Station) पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी पोलीस निरीक्षकपुजारी यांना बातमी मिळाली, भिमराज चेके (रा. चेकेवाडी, ता. पाथर्डी) याने राहत्या घरी बेकायदेशीररित्या गांज्या (Cannabis) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवलेला आहे. यासोबतच त्याने शेतामध्ये कडवळाच्या पिकामध्ये गांज्याची अवैध लागवड (Illegal Cultivation Cannabis) करून झाडांची जोपासना केली आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले. या माहितीनंतर पुजारी यांनी व पाथर्डीचे नायब तहसीलदार किशोर सानप यांच्या उपस्थितीत दोन पंचासह व पोलीस पथकासह छापा (Police Raid) टाकून कारवाई केली.
या छाप्यात राहत्या घरातून 94 हजार 800 रुपये किंमतीचा 3.150 किलो वजनाचा तयार गांजा, शेतामधून 95 हजार 760 रुपये किमतीचे 6.840 किलो वजनाची गांज्याची आठ झाडे असा 1 लाख 90 हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये, पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, विलास जाधव, हवालदार नितीन दराडे, बाबासाहेब बड़े, सुहास गायकवाड, इजाज सय्यद, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, अक्षय वडते, महेश रुईकर, प्रशांत केदार, उत्कर्षा वडते हे कारवाईत सहभागी झाले होते.




