Wednesday, February 4, 2026
HomeनगरAccident News : कारच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा मृत्यू

Accident News : कारच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा, पोखर्डी शिवारातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोखर्डी येथे गणपती मंदिराजवळ खेळणार्‍या सात वर्षीय मुलाला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अथर्व नंदू सुसे असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे काका राजेंद्र भाऊराव सुसे (वय 41, रा. पोखर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टाटा इंडिगो कार चालक पोपट कुंडलिक वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, 8 ऑगस्ट सायंकाळी अथर्व सुसे (वय 7) हा पोखर्डी ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्यालगत गणपती मंदिराजवळ खेळत होता. यावेळी वाघ याने आपल्या टाटा इंडिगो कारला बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगाने चालवत अथर्वला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाने कोणतीही मदत न करता पळ काढला. या अपघातात अथर्वचा जागीच मृत्यू झाला.

YouTube video player

घटनेनंतर राजेंद्र सुसे यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलीस हवालदार गणेश पालवे आणि सहाय्यक एम. बी. चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. अथर्वला सिव्हील हॉस्पिटल नगर येथे नेण्यात आले. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम...