Friday, May 2, 2025
Homeब्रेकिंग न्यूजआंबेवाडी शिवारात कारला अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

आंबेवाडी शिवारात कारला अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

नगर- मनमाड महामार्गावर तालुक्यातील आंबेवाडी शिवारात झालेल्या कार अपघातात दोघे जागीच ठार झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

आंबेवाडी शिवारात नगर- मनमाड महामार्गावर हुंडई कारला (क्रमांक एम एच ०४ एफ झेड ९६७८) पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेने कार रस्त्याच्या बाजूला हवेत उडून फेकल्या गेली. कारचा चक्काचूर झाला. शुक्रवारी, (दि. १३) पहाटे पाच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. या अपघातात कार मध्ये पाठीमागे बसलेले आकाश रमेश पवार व निलेश दगू शेवाळे रा. सावरगाव ता. येवला हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक शुभम गंगाधर पानमळे रा. सावरगाव ता. येवला गंभीर जखमी झाला आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन सहाय्य केले. करचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. खाजगी रुग्णवाहीकेद्वारे दोन्ही मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमी चालकावर उपचार सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

0
अहिल्यानगर | प्रतिनिधी  अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले....