रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव संगमनेर रस्त्यावर (Kopargav Sangamner Road) रांजणगाव देशमुख भागवतवाडी शिवारात स्विफ्ट डिझायर व युनिकॉन मोटारसायकलचा अपघात (Car And Bike Accident) होऊन दोन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. अपघात एवढा भिषण होता की, स्विफ्ट व मोटारसायकल एकमेकात पुर्ण गुंतल्या गेल्या. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.
स्विफ्ट डिझायर (क्रमांक एम. एच. 04 इ. एफ. 308) ही गाडी संगमनेरच्या देशेने जात होती. तर युनिकॅार्न मोटारसायकल (क्रमांक एम एच 17 सी डब्लु 2304) ही कोपरगावच्या (Kopargav) दिशेने जात होती. कोपरगाव संगमनेर तालुक्याच्या शिवेवर भरघाव वेगात असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने मोटारसायकलवरील दोघांना जोराची धडक (Hit) दिली.
त्यात ते दोघे लांब उडुन पडले व गंभीर जखमी (Injured) झाले. त्यांची मोटरसायकल गाडीत गुंतल्याने लांबपर्यंत ओढत नेली. स्विफ्ट मध्ये दोघे जण होते. ते अपघातानंतर तेथुन पसार झाले. स्थानिकांनी तातडीने जखमींना संगमनेर (Sangamner) येथे उचारासाठी पाठविले. ते दोघेही अत्यावस्थ होते. जखमींचे (Injured) नावे समजु शकले नाही.