Sunday, May 26, 2024
Homeनगरकार- दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू

कार- दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. भारत सुखदेव लालकर (वय 43 रा. पिंपळाचे पटांगण, कोळगाव ता. श्रीगोंदा) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत भास्कर नलगे (वय 55 रा. पिंपळाचे पटांगण, कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

कल्याण बायपास चौक ते केडगाव बायपास चौक दरम्यान हा अपघात झाला. कल्याण बायपास चौक ते केडगाव बायपास चौक जाणार्‍या रस्त्यावर टोलनाक्याचे काम चालू असल्याने वाहतूक एका मार्गावरून सुरू आहे. त्या रस्त्यावरून भारत लालकर हे त्यांच्या दुचाकीवरून कल्याण बायपासकडून केडगाव बायपासकडे जात असताना केडगाव बायपासकडून कल्याण बायपासकडे येणार्‍या कार चालकाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत भारत लालकर हे जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार औटी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या