पिंपळनेर/वार्ताहर dhule
- Advertisement -
पिंपळनेर-सटाणा (Pimpalner-Satana) रस्त्यावरील नाशिककडून (Nashik) पिंपळनेरकडे येणाऱ्या कारचा (car) अचानक स्पोट झाला. त्यानंतर कार जळून खाक झाली. या घटनेत चालकासह दोघे सुदैवाने बालमबाल बचावले.
शेलबारी घाटात पावडदेव वळणावर नाशिक कडून पिंपळनेरकडे येणारी एमएच 18-ए.जे २० १९ क्रमांकाची कारने आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला.
गाडीतील सागर राजेंद्र घरटे व गौरव भामरे यांना काहीतरी जळण्याचा वास आल्याने ते त्वरित गाडीच्या बाहेर पडले. त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच स्पोट झाला. यात गाडी जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. माहिती मिळतात पिंपळनेर पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.