Saturday, May 17, 2025
Homeनाशिककार-टेम्पो अपघातात तिघांचा मृत्यू

कार-टेम्पो अपघातात तिघांचा मृत्यू

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

नांदगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोखरी शिवारात भरधाव इर्टींगा कारने विरूध्द दिशेने जात मालवाहतूक करणार्‍या टेम्पोस धडक दिल्याने झालेल्या अपघातात जळगाव, ता. निफाड येथील तीन ठार झाले तर सहा जण गंभीररित्या जखमी झाले. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खाजगी बाजार समितीसमोर ही घटना घडली.

कासारी येथून लग्न समारंभ आटोपून इर्टींगा कार क्रमांक एम.एच.02-ई ई 2309 मधून नवरदेवाचा भाऊ निलेश कराडसह इतर वर्‍हाडी निफाड तालुक्यातील जळगावकडे जात होते. नांदगाव-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील भरधाव वेगाने जात असलेली ही कार पोखरी शिवारात विरुद्ध बाजूने घुसत कासारीकडे जात असलेल्या मालवाहतूक करणार्‍या टेम्पो क्रमांक एम.एच. 41-एयू 5316 खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जावून आदळल्याने कारसह टेम्पोच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला.

या अपघातात तुषार शरद कराड (25, रा.जळगांव) हा जागीच ठार झाला. घटनास्थळी नागरीक व पोलिसांनी धाव घेत अपघातील जखमींना मालेगांव आणि नाशिक येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान नवरदेवांचा भाऊ निलेश शरद कराड (26, रा. जळगाव) आणि अक्षय दौलत सोनवणे (24, जळगाव) या दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालक अमोल शिवाजी आहिरे (रा. नांदगाव) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इटिर्ंगा कार चालक वैभव वाल्मिक वेताळ (रा. जळगाव, ता. निफाड) याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jamkhed : मंगल कार्यालयातुन नववधूचे सोन्याचे दागिने चोरीला

0
जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed येथील मंगल कार्यालयातून नववधूंसाठी (Bride) आणलेले 75 ग्रॅम वजनाचे पावणेचार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) बुधवारी (दि.14) अज्ञात चोरट्याने...