Sunday, June 8, 2025
Homeक्राईमCrime News : अल्पवयीनला अंघोळ करताना चोरून पाहणार्‍यावर गुन्हा दाखल

Crime News : अल्पवयीनला अंघोळ करताना चोरून पाहणार्‍यावर गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

एका गावात अल्पवयीन अंघोळ करत असताना तिच्या घराच्या बाथरूमजवळील किचनच्या पत्र्यावर चढून डोकावून पाहणार्‍या मुलाविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 17 वर्षीय तरुणीला शेजारी राहणार्‍या 18 वर्षीय तरुणाकडून गेल्या काही महिन्यांपासून त्रास देण्याचा प्रकार सुरु होता. जानेवारी 2025 पासून हा तरुण तरुणीला दुचाकीवरून कॉलेजला जाताना रस्त्यात अडवून बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत होता.

फेब्रुवारीत बारावीच्या परीक्षेदरम्यान, हिंदीच्या पेपरला जाताना त्याने तरुणीशी लज्जास्पद वक्तव्य केले व त्यानंतर दमदाटी केली होती. भीतीपोटी संबंधीत तरुणीने घरच्यांना याबाबत सांगितले नाही. शनिवारी (दि. 7) सकाळी संबंधीत तरुणी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना हा तरुण किचनच्या पत्र्यावर चढून डोकावत होता. अल्पवयीन मुलीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरड केल्यानंतर तिची आई धावत आली.

कुटुंबीयांनी आणि शेजार्‍यांनी तरुणाला पकडून चोप दिला. यानंतर तरुणीने कुटुंबीयांसह पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाथर्डी पोलीस ठाण्यात संबंधीत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव अधिक तपास करीत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ठाकरे व पवार यांच्या एकत्रिकरणाच्या निव्वळ चर्चा – मंत्री...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उध्दव ठाकरे व मनसे तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरू आहेत. या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य...