Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : नाकाबंदीवेळी तरुणाचा उच्छाद; पाेलिसांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

Nashik Crime News : नाकाबंदीवेळी तरुणाचा उच्छाद; पाेलिसांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दर्श अमावस्येनिमित्त तळीरामांची शहरात धरपकड करण्यासाठी करण्यात आलेल्या नाकाबंदीवेळी (Blockade) एका तरुणाने (Youth) आरडाओरड करुन पोलिस कर्मचाऱ्यांना (Police Personnel) धक्काबुक्की केली. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमृतधाम परिसरात हा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी संशयित तरुणावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : गॅरेज मालकाचा प्रामाणिकपणा; ११ लाखांचा मुद्देमाल असलेला डबा केला परत

आडगाव पोलिस ठाण्यातील (Adgaon Police Station) अंमलदार चंपालाल सुळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आकाश रमेश गिरी (वय ३० रा. पेठरोड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. दरम्यान, फिर्यादी सुळे व त्यांचे सहकारी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील अमृतधाम चौकात नाकाबंदीच्या कर्तव्यावर हजर होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गिरी हा आरडाओरड करीत येताना त्यांना दिसला.

हे देखील वाचा : Nashik News : गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या १५ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका

दरम्यान, यावेळी पथकाने संशयिताला अडवून ओरडा दिला. त्यावेळी संशयितांनी पोलिसांना (Police) शिवीगाळ करीत फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी फिर्यादी यांच्या शासकीय गणवेशाचेही नुकसान झाले. त्यामुळे आडगाव पोलिसांनी तातडीने संशयिताला ताब्यात घेत गुन्हा (Case) नोंदविला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या