Saturday, September 14, 2024
Homeनगरकटरने एटीएम फोडून रोकड लंपास

कटरने एटीएम फोडून रोकड लंपास

कर्जत | Karjat

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील सिद्धटेक रोडवरील निळकंठ पेट्रोल पंप शेजारी असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन चोरट्यांनी कटरच्या साह्याने तोडून त्यामध्ये असलेले 28 हजार दोनशे रुपयांची रोकड चोरून नेण्याची घटना 24 तारखेला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील सिद्धटेक रोडवरील निळकंठ पेट्रोल पंपाशेजारी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन आहे. अज्ञात चार चोरटे मध्यरात्री एक वाजता त्याठिकाणी आले. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती, पेट्रोल पंपावर सामसूम झाली होती. याचा फायदा घेत त्या चार चोरट्यांनी कट्टर च्या साह्याने एटीएम मशीन कापले व त्यामध्ये असणारे 28 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सकाळी उघडकीस आली.

यानंतर याबाबत सचिन पांडुरंग कांबळे यांनी याबाबत कर्जत पोलीस स्टेशनला या घटनेची फिर्याद दिल्यानंतर आज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिन्याच्या आत राशीन व भांबोरा परिसरामध्ये दुसऱ्यांदा एटीएम मशीन कटर च्या साह्याने कापून चोरी करण्याची घटना घडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या