जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड पोलीस ठाण्यात जातपंचायतीच्या 22 पंचाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच दिवस होऊनही अद्याप एकाही पंचास अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान आज दिवसभरात डवरी गोसावी समाजातील जात पंचायतीसी सबंधीत मुंबईतील काही राजकीय पदाधिकार्यांनी जामखेड येथे येऊन पिडीतांवर दबाव टाकत हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाव्यतिरिक्त हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केल्यास अंधश्रध्दा निमुर्लन समिती (अनिस) व जात पंचायत मुठमाती अभियानाच्या वतीने राज्यभरात रान पेटवू असा इशारा जात पंचायत मुठमाती अभियानाचे राज्याचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिला आहे.
मुलीला नांदविण्यास नकार देणार्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार करणार्या जामखेड येथील एका कुटुंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावला असून डवरी गोसावी जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जामखेड येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 5 जुलै रोजी 22 पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.
याबाबत माहिती देताना जात पंचायत मुठमाती अभियानाचे राज्याचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगीतले की, जामखेड येथील डवरी गोसावी समाजाच्या जात पंचायतीने दिलेल्या निकाला बाबत आमच्याकडे पिडीत यांनी माहिती दिली होती. जातपंचायत मुठमाती अभियानाच्या पदाधिकार्यांनी तसेच संगमनेर येथील कार्यकर्त्या अॅड. गवांदे यांनी त्यांना पुर्ण आधार व सहकार्य देऊन तक्रार दाखल करण्यास मदत केली आहे. 5 जुलैला तक्रार दाखल झाली आहे. अनिस पुर्णपणे पिडीतांच्या पाठिशी उभी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.
असे आहेत गुन्हा दाखल झालेले संशयित पंच
राजाराम सखाराम शिंदे, बाबूराव राघू शिंदे, शिवाजी भिवाजी शिंदे, हरिश्चंद्र बाबूराव शिंदे (सर्व रा. यवत, ता. दौंड), साहेबराव भिवाजी शिंदे, बाबाजी पिराजी आहेर, लखन साहेबराव शिंदे (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), अनिल भिवाजी सावंत, भिवाजी नाना सावंत, बाबूराव तात्या चव्हाण, शंकर भयरू सावंत, श्यामराव भीमराव चव्हाण (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे), भगवान शंकर शिंदे (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), रूपचंद दतात्रय सावंत, संजय दगडू सावंत (रा. पेडगाव रस्ता, ता. श्रीगोदा), नाथा नारायण बाबर (रा. हंडीनिमगाव सुरेशनगर, ता. नेवासा), पिराजी राजाराम शिंदे, शिवराम भयरू सावंत, दया दादाराव सावंत (रा. नाथनगर सोनई, ता. नेवासा), चिमाजी गंगाधर शेगर (रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), बाबाजी भगवान शिंदे (रा. चांदा, ता. नेवासा), प्रकाश एकनाथ सावंत (रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे).