Saturday, November 2, 2024
Homeभविष्यवेधमांजर आणि शुभाशुभ संकेत

मांजर आणि शुभाशुभ संकेत

अशा अनेक समजुती आहेत जसे की मांजर आडवी गेली तर लोकं थांबतात आणि एखादी दुसरी व्यक्ती पुढे जाईपर्यंत पुढे जात नाहीत, असे केल्याने अशुभ शकुन संपतो. तर काही लोकं रस्ता ओलांडताना जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ते थुंकतात आणि काही काळ थांबतात नंतर रस्ता ओलांडतात. अशा समजुती पारंपारिक पद्धतीने पिढ्यान् पिढ्या पाळल्या जात आहेत. शेवटी, या मागचे कारण काय आहे ? मांजर आडवी जाणे खरोखरच अशुभ आहे का ? या अशा समजुतीमागील कारणे काय आहेत, याचा कधी विचार केला आहे का ? आपण यामागील कारण जाणून घेऊया…

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात बेक्का लेले गावात मांजरीला केवळ शुभ मानले जात नाही तर तेथे मांजरीचे मंदिर असून,मांजरीची देवी म्हणून पूजा केली जाते. तसेच, इजिप्तमध्ये, मांजरीची देवी म्हणून पूजा केली जाते. भारतासह जगभरात मांजरीबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. अशा परिस्थितीत, आपण मांजरीशी संबंधित काही शकुन आणि अपशकुन बद्दल जाणून घेऊया.

- Advertisement -

मांजरीच्या अपशकुनामागे हे देखील एक कारण आहे- धार्मिक ग्रंथांमध्य अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानले जाते. अलक्ष्मी जीवनात नेहमीच दारिद्र्य आणि संकट आणते. अलक्ष्मीचे वाहन म्हणून मांजरीला चित्रित केले आहे. या स्वरूपात, मांजर भारतीय लोकांमध्ये अशुभतेचे प्रतीक मानले जाते. परंतु दिवाळीच्या दिवशी मांजरीने घरात प्रवेश करणे शुभ मानले जाते.

असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी जर एखादी मांजर घरात आली असेल तर दारिद्र्य दूर होते तसेच, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. परंतु हे सहसा घडत नाही कारण फटाक्यांच्या आवाजामुळे, मांजरींसह बहुतेक प्राणी लपलेले असतात. अशा परिस्थितीत जरी मांजर आली, तर असे मानले जाते की अलक्ष्मी तुमचे घर सोडून जात आहे.

मांजर आडवी जाणे अशुभ मानले जाते कारण- ज्योतिषशास्त्रात अशुभ ग्रह म्हणून राहू मानला जातो, जो तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांचे मूळ कारण आहे. त्याच्या अशुभ परिणामांमुळे जीवनात नकारात्मकता येते आणि अपघात होण्याची शक्यता असते. दुसरीकडे, मांजरीचे वर्णन वैदिक ज्योतिषशास्त्रात राहूचे वाहन म्हणून केले गेले आहे. राहूचे वाहन असल्यामुळे भारतीय लोकांमध्ये मांजर आडवी जाणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की राहू जसा अपघातांचे मूळ आहे, त्याप्रकारे मांजर आडवी गेल्याने अपघाताची शक्यता वाढते किंवा काही अप्रिय घडू शकते. म्हणजेच, मांजरीवर असलेल्या राहूमुळे लोक मांजर आडवी जाणे शुभ मानत नाहीत.

मांजरीशी संबंधित काही शुभशकुन आणि अपशकुन- सामान्यतः कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते, परंतु मांजरीचे रडणे देखील अशुभ असते. असं म्हणतात की मांजरीचे वारंवार रडणे त्रास घेऊन येते आणि लवकरच काहीतरी वाईट घडू शकते. मांजरीच्या तोंडात जर मांसाचा तुकडा दिसला तर ते शुभ असतं. असं म्हणतात की याद्वारे सर्व कार्य सहजतेने पूर्ण होते आणि तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते. एखादी मांजर तिच्या पिलांंसोबत जाताना दिसली तर ते एक शुभ चिन्ह मानले जाते. असे मानले जाते की लवकरच एखादा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो आणि त्यांच्याकडून एखादी चांगली माहिती मिळू शकते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या