Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारचौपदरीकरणाच्या कामावरील साहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड

चौपदरीकरणाच्या कामावरील साहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

येथील महामार्गावरील (highway) चौपदरीकरणाच्या (Caupadarikaraṇacya) कामावर असलेल्या लोखंडी साहित्याची चोरी (Theft of iron materials) करणार्‍या टोळीचा (Gang) नवापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक (Arrested) करण्यात आली असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील अर्हम इन्फ्रा लिमिटेड हैदराबाद (Arham Infra Limited Hyderabad) या कंपनीचे बांधकामाचे साहित्य (Construction materials) परिसरात ठेवले असता चोरीला (Stolen) गेल्याची घटना १२ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती.

या संदर्भात अर्हम इन्फ्रा लिमिटेड हैदराबाद कंपनीचे हंसराज देवराम मेघबन्सी यांनी नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार (Complaint) दाखल केली. त्या अनुषंगाने नवापूर पोलीसांनी चोरट्यांचा शोध घेत सात संशयित आरोपींना अटक (Seven suspects arrested) केली आहे.

त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी (Police cell) सुनावली आहे. या गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती वाहन (क्र. जी.जे.०५ वाय.वाय.३३८८) जमा करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील एकूण २ लाख ३० हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी अक्षय मनोज मोहिते (वय २४, देवळफळी), पवन अरविंद पाडवी (वय २२, लखाणी पार्क), बादल अरविंद पाडवी (वय २०, लखाणी पार्क), अरूण महिंद्र गावित (वय २८, भोई गल्ली), समीर बशीर शहा (वय २०, देवळफळी), चालक शोएब हुसनोद्दीन शेख (वय ३२ देवळफळी), लोखंड खरेदी करणारे कैय्युम कदीर शहा (वय २१, रा.लखाणीपार्क) अशा सात संशयित आरोपींविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

६० हजार ३६१ किंमतीचे लोखंडी साहित्य चोरीला गेले होते. त्यातून अर्धा मुद्देमाल मिळून आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, हे.कॉ.दादाभाई वाघ, विकास पाटील, विनोद पराडके, नितीन नाईक, संदीप सोनवणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास हेकॉ दादाभाई वाघ करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या