Thursday, January 8, 2026
Homeनगरक्लीनरची सावधानता, अपघात टळला मात्र चालकांचा मृत्यू

क्लीनरची सावधानता, अपघात टळला मात्र चालकांचा मृत्यू

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील नगर-मनमाड महमार्गावर (Nagar Manmad Highway) मंगळवारी मध्यरात्री 12.15 वाजेच्या सुमारास पंजाब येथील ट्रक चालक बलविंदरसिंग मागेल सिंग हा आपल्या ताब्यातील ट्रक चालवत असताना त्यास अचानक फिट येऊन तोंडातून फेस निघू लागल्यावर क्लीनर सनी सोनू चंडाल याने वेळीच सावधानता दाखवत सदर ट्रक (Truck) आपल्या ताब्यात घेऊन वेळीच रस्त्याच्या एका बाजूस लावल्याने राज्य मार्गावर मोठा अपघात (Accident) टळला.

- Advertisement -

क्लीनर सनी सोनू चंडाल याने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून चालकास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केलं असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले. क्लीनरने त्यानंतर सदर घटना कोपरगाव तालुका पोलिसांच्या निदर्शनास आणली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पो.हे.कॉ.एन.एस.शेख यांनी भेट दिली. कोपरगाव तालुका पोलिसांनी (Kopargav Taluka Police) या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्र.27/2024 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शाखाली पो.हे.कॉ.शेख करीत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

नगरसेवक

Ambernath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘ते’ १२ नगरसेवक भाजपच्या गोटात

0
मुंबई | Mumbaiअंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू...