Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशसीबीआयची मोठी कारवाई; पाच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक संचालकाला सीबीआयकडून अटक

सीबीआयची मोठी कारवाई; पाच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक संचालकाला सीबीआयकडून अटक

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) (Central Bureau Of Investigation) सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) (Enforcement Directorate) एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. ईडीमध्ये सहाय्यक संचालक पदावर असलेल्या पवन खत्री या अधिकाऱ्याने आरोपी अमनदीप सिंह ढल्ल याच्याकडून ५ कोटींची लाच घेतली होती. सीबीआयने खत्रीसोबत दोन अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदविली होती. आता तपासानंतर खत्रीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

ईडीच्या तक्रारीवरून सीबीआयने ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री आणि उच्च विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, अटक करण्यात आलेला व्यापारी अमनदीप सिंग धल्ल, गुरुग्रामचे रहिवासी बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा; ठाकरेंना उत्तर देणाऱ्या कावड यात्रेत फिरवली तलवार

ढल्ल आणि सिंह यांनी दारु घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आरोपींची मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २३ या दोन महिन्यांत वत्स यांना ५ कोटी रुपये दिले होते. सांगवानने ढल्लना अटकेपासून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. याचसाठी सांगवानने वस्त याची ईडी अधिकारी खत्री यांची भेट घडवून दिली होती.

प्रवीण वत्स यांनी अमनदीप धल्ल यांच्याकडून डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत तीन कोटी रुपये घेतले. यानंतर दीपक सांगवान यांनी वत्स यांना सांगितले की आणखी दोन कोटी रुपये दिले तर, अमनदीप सिंग धल्ल यांना आरोपींच्या यादीतून मुक्त केले जाऊ शकते. प्रवीण वत्स यांनी ही बाब अमनदीप धल्ल यांना सांगितली. त्यांनी प्रस्ताव मान्य केल्यानंतर वत्स यांनी धल्ल यांच्याकडून आणखी दोन कोटी रुपये घेतले.

‘मी अजून दारूला …; द्राक्ष बागायत संघाच्या परिषदेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी

हे पैसे कॅशमध्ये दिले गेले होते. एवढे पैसे देऊनही ढल्लला १ मार्चला ईडीने अटक केली होती. यावर सांगवानने वत्सला हे आदेश वरून आलेत असे उत्तर दिले होते. यानंतर दिलेले पैसे मागे देण्यासाठी बोलणी सुरु झाली आणि सारे बिंग फुटले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे समजले.

यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि संशयित अधिकाऱ्यांसह या प्रकरणातील आरोपींच्या निवासस्थानाची झडती घेतली. यावेळी ईडीने प्रवीण वत्स यांच्या घरातून २.१९ कोटी रुपये रोख रक्कम आणि १.९४ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने जप्त केले. तसेच त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये होते. ईडीने प्रवीण वत्सच्या घरातून दोन आलिशान कारही जप्त केल्या. ईडीच्या सांगण्यावरून एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयने आरोपींशी संबंधित इतर ठिकाणांचीही झडती घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या