Sunday, April 27, 2025
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयची धाड

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयची धाड

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. सीबीआयने (CBI) दिल्लीत ३० ठिकाणी छापे (Raid) टाकले आहेत. यात जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी मलिक यांच्या घरावर संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयची ही छापेमारी केली आहे. या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी ३०० कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप मलिक यांनी केला होता. किश्तवाडमधील किरू जलविद्युत प्रकल्पासाठी २,२०० कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २०१९ मध्ये हा छापा टाकण्यात आला होता.

दरम्यान, २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असलेल्या मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. किरू जलविद्युत परियोजना (६२४ मेगावाट), एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्येकी १५६ मेगावॅट क्षमतेच्या ४ युनिट्ससह १३५ मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री...

0
मुंबई | Mumbai लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या...