मुंबई | Mumbai
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने २०२६ मधील १० वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केलेत. हा निकाल अधिकृत वेबसाइट, डिजीलॉकर, उमंग ॲप आणि इतर माध्यमांवरून पाहता येईल. खालील दिलेल्या सूचना वाचल्या तर तुम्हाला तुमचा निकाल सहजपणे डाउनलोड करण्यास मदत होईल.
विद्यार्थी त्यांचे गुणपत्रक विविध अधिकृत माध्यमांवरून तपासू शकतील: cbseresults.nic.in, cbse.gov.in, DigiLocker आणि UMANG ॲप. आपला निकाल ऑनलाइन तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर, स्कूल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. लॉग इन केल्यानंतर लगेचच डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. CBSE इयत्ता 10वी निकाल 2026 साठीची थेट लिंक अधिकृत वेबसाइट http://www.cbse.gov.in वर सक्रिय करण्यात आली आहे.
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट! घटनेच्या तपासासाठी ४७ पोलिसांची SIT, सखोल तपास होणार
सीबीएसई 10वी निकाल 2026 कसा तपासावा
जेव्हा सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल 2026 झाला आहे. तेव्हा विद्यार्थी आपला रोल नंबर टाकून ऑनलाइन निकाल तपासू शकतील. निकाल तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
स्टेप 1 – विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
स्टेप 2 – विंडो उघडल्यावर, ‘माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10वी) निकाल 2026’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 – तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र आयडी प्रविष्ट करा.
स्टेप 4 – माहिती सादर केल्यावर, निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5 – विद्यार्थ्यांनी भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड किंवा प्रिंट करावा




