Sunday, April 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपरतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट! घटनेच्या तपासासाठी ४७ पोलिसांची SIT, सखोल...

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट! घटनेच्या तपासासाठी ४७ पोलिसांची SIT, सखोल तपास होणार

अमरावती | Amravati
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणासारखेच परतवाडा येथील अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या प्रकरणातील सखोल तपासासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि तपासात कोणतीही कसर न सोडण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची ‘एसआयटी’ची घोषणा केली आहे.

अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी विशेष तपास पथक (SIT) ची स्थापनेची घोषणा केली असून या एसआयटीमध्ये ४७ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

Aaditya Thackeray: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाच्या चर्चा; आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने १८० तरुणींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. मंगळवारी या प्रकरणात दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपी मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर याची चौकशी सुरू आहे.

परतवाड्यातील या प्रकरणाचे गांभीर्य आणि समाजातील वाढता संताप लक्षात घेता, पारदर्शक आणि वेगवान तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीचे पोलिस अधीक्षक यांच्याकडून ११ पोलिस अधिकारी आणि ३६ अंमलदारांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून परतवाडा प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास केला जाणार आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे तपास पथकाचे मुख्य प्रमुख असणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सायबरचे ‘राजस्थान कनेक्शन’

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरात (Nashik City) गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन गुंतवणुकीच्या (Online Fraud) नावाखाली फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. नोव्हेंबर २०२५ पासून सुरू...