दिल्ली | Delhi
सीबीएसई (CBSE) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीमध्ये ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ६ टक्क्यांनी जास्त आहे. बारावी परीक्षेत ९०.६८ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.६७ टक्के आहे.
cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल.
निकाल कसा पाहाल?
-
CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.
-
मेन पेजवर, ‘CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक’ वर क्लिक करा.
-
लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांना रोल नंबर आणि जन्मतारीख एन्टर करावी.
-
तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.
-
विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.
Elon Musk : एलन मस्क होणार पायऊतार, ‘ही’ असणार नवी CEO?
SMSद्वारे असा चेक करा रिझल्ट
-
फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जा.
-
Text Message वर जाऊन CBSE 12 वी टाइप करा. त्यानंतर स्पेस न देता रोल नंबर प्रविष्ट करा.
-
त्यानंतर 77388299899 वर पाठवा.
-
रिप्लायमध्ये रिझल्ट येईल.
Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा डान्स सुरू झाला अन् पत्र्याचं शेड कोसळलं, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद
स्कोअर कार्ड तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
-
रोल नंबर
-
स्कूल नंबर
-
जन्मतारीख
-
प्रवेशपत्र ओळखपत्र.
Accident : प्रवाशांसह बस पैनगंगा नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर १७ जण जखमी
गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल खाते उघडत आहे. ज्यामध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मार्कशीट उपलब्ध करून दिली जाते. खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ६ अंकी पिन वापरला जातो. बोर्डाने या पिनचा तपशील शाळांना पाठवला आहे आणि शाळांना तो डाउनलोड करून प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षितपणे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.