Saturday, May 18, 2024
Homeक्राईमNashik News : मंत्री भुजबळांच्या सहाय्यकाला ५० हजारांचा ऑनलाईन गंडा

Nashik News : मंत्री भुजबळांच्या सहाय्यकाला ५० हजारांचा ऑनलाईन गंडा

संशयित पोलिसांच्या ताब्यात

येवला | प्रतिनिधी | Yeola

अद्यावत तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud)अनेक घटना घडत आहेत. सर्वसामान्य अशिक्षित आणि माहिती तंत्रज्ञानाला नवपरिचित असे नागरिक या फसवणुकीला बळी पडताना दिसत आहेत. अशातच आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या सहाय्यकाला देखील ऑनलाईन ५० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी (City Police) एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात बंदी मागे

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २८ फेब्रुवारी रोजी तक्रारदारांच्या मोबाईल क्रमांकावर सकाळी आठ वाजता मेसेज आला की, साहेब आमचा अपघात झाला आहे. तीन जण ठार झालेले आहेत. साहेब प्लीज मदत करा. आम्ही येवल्याचे रहिवासी आहोत. पनवेल मध्ये गुणे हॉस्पिटलमध्ये आहोत. साहेब प्लीज मदत करा आणि खाली रविकांत मधुकर फसाळे नाशिक असे नमूद केलेले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांनी शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती. 

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : नाशिकमधील ३ तर दिंडोरीतून ५ उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद

यानंतर भुजबळांच्या सहाय्यकाने तात्काळ मदत (Help) म्हणून फोन पे ॲपद्वारे संबंधित संशयितास ५० हजार रुपये पाठवले. त्यानंतर संबंधित क्रमांकावर फोन केले असता, फोन न लागणे, फोन डायव्हर्ट केल्याचे आढळून आल्याने संशय वाढला. यावेळी भुजबळांच्या सहाय्यकाने येवला शहरामध्ये (दि. २८ फेब्रुवारी) रोजी कुणाचा बाहेरगावी अपघात झाला आहे का? तीन जण मयत झाले आहेत का? याची चौकशी मित्रांच्या साह्याने केली. पंरतु, असा कुठलाही प्रकार शहर व आसपास घडलेला नसल्याचे समजताच त्यांनी येवला शहर पोलिसांत (दि. २३ एप्रिल) रोजी फिर्याद दाखल केली होती.

हे देखील वाचा : नाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

दरम्यान, याप्रकरणी येवला शहर पोलिसांनी (Yeola City Police) सखोल तपास करीत मोबाईल लोकेशन व तांत्रिक विश्लेषण करून जव्हार मोखाडा (Mokhada) भागातील एका खेड्यातून संशयितास सिनेस्टाईल ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात (Court) हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या