खोपोली | Khopoli
राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे, अशातच रायगडमधील खोपीलीमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मंगेश यांची निघृण हत्या करुन मृतदेह रस्त्यात फेकण्यात आला होता. दरम्यान या हत्येचे सीसीटीव्ही आता समोर आले आहे. भर रस्त्यावर हल्लेखोरांनी तलवार, कोयत्याने २५ ते २७ वार करून हत्या केली. अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगेश हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. मंगेश काळोखे यांच्यावर हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि धारधार शस्त्रांनी पाठलाग करून हत्या केली होती.
मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष हत्या करणारे आणि कट रचणारे अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांच्या सह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय. तर पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे.
मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडून येत असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मंगेश यांची निघृण हत्या करुन मृतदेह रस्त्यात फेकण्यात आला. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुक वादातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हल्लेखोर मंगेश काळोखे यांचा पाठलाग करत आहे. रस्त्यावर पुढे जाऊन मंगेश काळोखे हे खाली पडले. त्यानंतर ३ जणांनी त्यांना घेरले आणि एकापाठोपाठ सपासप तलवार आणि कोयत्नाने वार केले. काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हल्लेखोरांनी सपासप वार केल्याचे दिसते आहे. जवळपास २५ ते २७ वार हल्लेखोरांनी केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखे हे जागेवर कोसळले. काळोखे यांचा मृत्यू झाल्याचे समजून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊंसर आणि इतर तीन अनोळखी लोकांविरोधात खोपोली पोलिसात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




