Tuesday, February 3, 2026
Homeनगरधक्कादायक! सेल्फॉस पावडरच्या वासाने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

धक्कादायक! सेल्फॉस पावडरच्या वासाने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

आईची प्रकृती चिंताजनक

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

नगर-कल्याण महामार्गावरील (Nagar Kalyan Highway) ढोकी येथील धरमवस्तीवर बाजरी धान्य (Millet Grain) टिकवण्यासाठी वापरलेल्या सेल्फॉस पावडरच्या (Celphos Powder) वासाने दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.29) सकाळी घडली. या घटनेत मृत मुलांची आई सोनाली विठ्ठल धरम (वय 25) यादेखील बेशुद्ध झाल्या आहेत. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलांमध्ये हर्षल विठ्ठल धरम (वय 5 महिने) आणि नैतिक विठ्ठल धरम (वय 5 वर्षे) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी विठ्ठल धरम यांनी बाजरीला कीड लागू नये म्हणून गुरुवारी रात्री धान्याच्या पोत्यात सेल्फॉस पावडर ठेवली होती. शुक्रवारपासून या कुटुंबातील दोन्ही मुलांना (Child Death) आणि आईला मळमळ, उलट्या यांसारख्या तक्रारी सुरू झाल्या. रविवारी पहाटे प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

YouTube video player

या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी रविवारी दुपारी 4:30 वाजता नगर-कल्याण महामार्गावर रास्तारोको केला. त्यानंतर टाकळी ढोकेश्वर (Takali Dhokeshwar) येथील कृषी केंद्रासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडगळे, साहाय्यक फौजदार गणेश डहाळे, पोलिस कॉन्स्टेबल मच्छिंद्र खेमनर, सागर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देत नातेवाइकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या घटनेने धान्य साठवणुकीसाठी वापरल्या जाणार्‍या रासायनिक पावडरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
मयत नैतिक व हर्षद यांच्यावर ढोकी ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात रविवारी (दि.28) सायंकाळी अंत्यसंस्कार केले. त्यापूर्वी ग्रामस्थांनी दोन्ही चिमुरड्यांचे मृतदेह कीडनाशके घेतलेल्या कृषी सेवा केंद्राच्या दुकानासमोर ठेवून आक्रोश व संताप व्यक्त केला. दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पारनेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर व दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या आश्वासनानंतर या दोन चिमुरड्यांवर शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावात अंत्यसंस्कार केले. रात्री उशिरापर्यंत पारनेर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नॉदिवण्याचे काम सुरु होते.

धान्याला कीड लागू नये, यासाठी मसेलफॉसफ पावडर वापरली जाते. ही पावडर अतिविषारी असून अल्युमिनियम फॉस्पेट हा घटक असल्याने वापर झाल्यानंतर त्याचा रासायनिक गॅस तयार होतो. या पावडरीवर बंदी नाही. ती कशी वापरायची, यासंदर्भातील सूचना पाकीटावर दिल्या आहेत.

– गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी, पारनेर

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...