नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्र सरकारने जनगणना २०२७ संदर्भातील महत्त्वाची घोषणा केली आहे. जनगणनेच्या (Census 2027) दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ४० प्रश्नांची (40 Question List) सूची ‘रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तां’कडून अधिसूचित करण्यात आली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही पूर्णपणे डिजिटल जनगणना (Digital Census) होणार असून, यामध्ये जात आणि कोविड-१९ लसीकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत.
जात, कोरोना लसीकरणासह अनेक महत्त्वाचे प्रश्न जनगणना अधिकाऱ्यांकडून प्रत्येक व्यक्तीची सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याविषयक माहिती घेतली जाणार आहे. त्यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश असेल.
स्वातंत्र्यानंतरची ही आठवी (आणि एकंदरीत १६ वी) जनगणना असणार आहे. २०२१ मध्ये होणारी जनगणना कोविड-१९ च्या जागतिक साथीमुळे स्थगित करण्यात आली होती. यावेळच्या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यात पहिल्यांदाच व्यापक स्तरावर जातीगत आकडेवारी गोळा केली जाणार आहे.
व्हायरल व्हिडिओतील ‘त्या’ चिमुकल्यांचा आदित्य ठाकरेंकडून सत्कार; गोहिरेवाडीत जाऊन साधला संवाद
नागरिकांना ते अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) मधील आहेत का? तसेच त्यांची विशिष्ट जात कोणती? याविषयी थेट प्रश्न विचारला जाईल.
जनगणनेला कधीपासून सुरवात होणार?
लडाख तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बर्फाच्छादित भागांमध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत लोकसंख्या गणना केली जाणार आहे. घराघरात जाऊन गणना सुरू होण्यापूर्वी 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या काळात नागरिकांना स्वतः ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध असेल. देशातील उर्वरित भागांमध्ये लोकसंख्या गणना पुढील वर्षापासून सुरू होणार आहे.
नागरिकांना विचारले जाणारे प्रमुख प्रश्न
तुमचे पूर्ण नाव काय?
कुटुंबप्रमुखाशी तुमचे नाते काय?
तुमचे लिंग काय?
जन्मतारीख आणि वय किती?
वैवाहिक स्थिती काय?
तुमचा धर्म कोणता?
तुमची जात कोणती?
तुम्ही अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा इतर कोणत्या सामाजिक गटात येता?
तुमची मातृभाषा कोणती?
इतर कोणत्या भाषा येतात?
शैक्षणिक पात्रता किती?
तुम्ही सध्या शिक्षण घेत आहात का?
तुम्ही कोणता व्यवसाय करता?
रोजगाराचे स्वरूप काय?
तुम्ही स्थलांतर केले आहे का? असल्यास कुठून?
अपंगत्व असल्यास त्याचा प्रकार कोणता?
महिलांसाठी संततीसंदर्भातील काही माहिती.
तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का? घेतली असल्यास किती डोस घेतले आहेत?
घरासंदर्भातील माहितीही घेतली जाणार
व्यक्तीगत माहितीबरोबरच घर आणि मूलभूत सुविधांबाबतही माहिती संकलित केली जाणार:
घराचे मालकी हक्क
घराची स्थिती
पिण्याच्या पाण्याचा स्रोत
वीज उपलब्धता
स्वच्छतागृह
स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन
इंटरनेट सुविधा
मोबाईल क्रमांक
टीव्ही, संगणक, लॅपटॉप
दुचाकी, चारचाकी वाहन
स्वयंपाकघराची उपलब्धता
कुटुंबातील सदस्यांची संख्या आदींचा समावेश आहे.
जातीनिहाय माहितीवर विशेष भर
डिजिटल जनगणनेलाही प्राधान्य
यावेळी जनगणना अधिक आधुनिक पद्धतीने केली जाणार असून नागरिकांना काही भागात Self Enumeration (स्वतः माहिती भरण्याची सुविधा) देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांकडून मोबाइल अॅप आणि डिजिटल साधनांचाही वापर केला जाणार आहे.
जनगणनेचे महत्त्व
जनगणनेतील माहितीच्या आधारेच देशातील लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक रचना, पायाभूत सुविधा, निधीचे वाटप आणि विविध सरकारी योजनांचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




