Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्यांच्या नसबंदीला केंद्राची मान्यता; हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रवण क्षेत्रात शेळ्या, कोंबड्या सोडण्याचा...

बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राची मान्यता; हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रवण क्षेत्रात शेळ्या, कोंबड्या सोडण्याचा निर्णय, वनमंत्र्यांची माहिती

पुणे | Pune
बिबट्यांना खाद्य म्हणून आता शेतात अन बिबट प्रवण परिसरात शेळ्या सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मानवा वरील हल्ले कमी होण्यास मदत होईल. तसेच बिबट्याच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. पुणे शहरातील वनविभागाच्या मुख्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

या बैठकीनंतर गणेश नाईक यांनी सुचवलेला उपाय सध्या चर्चेचा विषय बनत आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांना कोंबड्या आणि शेळ्या खाऊ घालण्याचा उपाय सुचवला असून तो अमलात देखील आणला जाणार आहे. या बैठकीत पुणे,अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्यांबाबत आढावा घेत कृती आराखडाही दिला.

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा विचार केल्यास 1982 च्या दरम्यान हा भाग काहीसा ओसाड होता. त्यानंतर या भागामध्ये धरण बांधण्यात आली आणि या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात होऊ लागली त्यामुळे एक प्रकारे या भागात जंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

YouTube video player

सुरवातीला या भागात बिबट्यांची संख्या कमी होती पण, आता बिबट्यांची संख्या देखील खुप वाढली असून मानवी वस्तीमध्ये हल्ले देखील होत आहेत. त्यामुळे बिबट्या पकडण्यासाठी 200 पिंजरे उपलब्ध करण्यात आले असून आता त्यांची संख्या १ हजार केली जाणार आहे.

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू पडला तर 25 लाख रुपये सरकारला द्यावे लागतात. त्याच्या ऐवजी बकरी हे बिबट्याचं खाणं करून बकरी, शेळ्या जंगलात सोडून देऊन त्यांना बिबट्यासाठी करून दिल्यास नागरिकांवरील हल्ले कमी करण्याची मदत होईल अशी उपाय योजना वन मंत्र्यांनी सुचवली आहे.

बिबट प्रवण क्षेत्रात आता शेळ्या सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामुळे मानवी वस्तीवरील हल्ले कमी होतील. बिबट नसबंदीला केंद्राची मान्यता मिळाली असून शिकारीचा निर्णय विचाराधीन आहे. मात्र जेथे बिबट नियंत्रणातच येत नसेल तेथे त्याला तेथेच गोळ्या घालण्याचे आदेश आहे. या बाबी वनमंत्र्यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगीतल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरु – मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न...