Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटीबद्ध - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटीबद्ध – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे 'किसान सुसंवाद' कार्यक्रम

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी

YouTube video player

देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार भारत सरकारचे कृषी मंत्रालय सोबत सिंचन, पशुपालन असे पूरक विभाग आणि देशातील कृषी विज्ञान केंद्रे कटीबद्ध आहेत. विकसित भारत – जी रामजी’ योजनेतून शेतीला पूरक कामे प्राधान्याने केली जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आज दुपारी किसान सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, प्र – कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे सहाय्यक महानिदेशक डॉ. राजश्री रॉय बर्मन, कृषि प्राद्योगिकी अनुसंधान संस्थान व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे संचालक डॉ. एस. के. रॉय, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण भागाचे संचालक रफिक नायकवाडी, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे वैज्ञानिक डॉ. शाकीर अली सय्यद, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितिन ठोके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना पुढे केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आपण देव पाहतो. शेतकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतकरी कष्ट करून जे उत्पादित करतो ते कुठलेही मशीन, ए. आय. किंवा रोबोट उत्पादित करू शकत नाही. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी प्रक्रिया केंद्रे (प्रोसेसिंग युनिट) साठी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु दुर्दैवाने काही शेतकऱ्यांना त्यांची पूर्ण माहिती मिळत नाही तर काही योजनांमध्ये मर्यादा असते. शेतकरी मालावरील प्रक्रिया केंद्रे आणि अन्य विषयासंदर्भात आपण राज्यशासनाशी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले. देशातील लहरी हवामान किंवा शेतजमिनीचे कमी क्षेत्रफळ असणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती (इंटेग्रेटेड फार्मिंग) म्हणजे शेतीत फक्त एकच पीक न घेता, पिकांसोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फळे – फुले आणि भाजीपाला यांसारख्या विविध पूरक व्यवसायांची सांगड घालावी असे आवाहन देखील त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले. यावेळी नामदार श्री. चौहान यांच्या हस्ते मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रातर्फे उत्पादित ‘यश माइक्रो – न्युट्रीएन्टस ग्रेड – २’ या सूक्ष्म अन्नद्रव्य उत्पादनाचे लोकार्पण करण्यात आले.

यानिमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता बचत गट व शेतीसंदर्भातील स्टॉलला भेट देत महिला व शेतकरी वर्गाशी संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या हस्ते कृषि विज्ञान केंद्र आवारात बहावा झाडाचे रोपण करण्यात आले. नामदार चौहान यांचे प्रत्यक्ष भाषण सुरु होण्यापूर्वी त्यांच्याशी पेठचे यशवंत गावंडे (शेतीमाल प्रक्रिया केंद्रे), जानोरीचे गणेश वाघ (फुलबागा शीतगृह अनुदान), नाशिकचे रवींद्र अमृतकर (शेतीसाठी यांत्रिकीकारणाचा फायदा), अजमेर सौंदाणेचे नानाभाऊ पवार (कांदापीक) यांनी आपपाल्या विषयानुरूप संवाद साधला. मुक्त विद्यापीठ कृषि विज्ञान केंद्राच्या माजी विद्यार्थिनी व मशरूम उद्योजिका श्रीमती वैशाली उदार यांचा मंत्री चौहान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंदे मातरम गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले. त्यांच्या हस्ते मंत्री चौहान यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. डॉ. शाम कडूस पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास शेतकरी, बचतगट महिला व विद्यापीठ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा...