संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
महाराष्ट्रात (Maharashtra) अतिवृष्टीने (Heavy Rain) शेतकर्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. मात्र शासन कोणताही निर्णय घेत नाही .त्यामुळे शेतकर्यांमध्ये मोठी नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य हे केंद्र सरकारला (Central Government) सर्वात जास्त जीएसटी (GST) देत असून त्यामधून परतावा करत केंद्राने शेतकर्यांना मोठी मदत करावी अशी मागणी महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली असून ठाकरे बंधूंनी देशात सुरू असलेल्या चुकीच्या राजकारणाविरुद्ध एकत्र येऊन एल्गार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विजयादशमीच्या (Vijayadashami) शुभेच्छा देताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व जनतेला हे वर्ष आनंदाचे समाधानाचे सुखाचे जाऊ दे. शेतकर्यांवर जे अतिवृष्टीने नुकसान आले आहे त्यातून त्यांना उभी राहण्याची ताकद मिळावी. प्रार्थना त्यांनी केली. याचबरोबर यावर्षी राज्यामध्ये मोठा पाऊस झाला असून शेतकर्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पूर आले आहेत. अशा शेतकर्यांना तातडीने मदत केली पाहिजे. मात्र शासन कोणताही निर्णय घेत नाही. मंत्री लोकांमध्ये जात नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.
अशा संकट काळात सरकार कुठे आहे? असा मोठा प्रश्न असून शेतकर्यांमध्ये (Farmer) सरकार बाबत मोठी नाराजी आहे. पंजाब प्रमाणे सरकारने शेतकर्यांना मदत केली पाहिजे. कारण महाराष्ट्राची परिस्थिती ही पंजाब पेक्षा नक्कीच चांगली आहे. महाराष्ट्र हे जीएसटीमधून (GST) केंद्राला मोठा निधी देत असते केंद्रांना त्यातून परतावा म्हणून आता शेतकर्यांना तातडीने मोठी मदत करावी. तसेच शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी मा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच दसर्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील आनंदच आहे.
देशांमध्ये आणि राज्यांमध्ये चुकीचे राजकारण सुरू आहे. त्याविरुद्ध ठाकरे बंधूंनी एल्गार करावा, अशी अपेक्षाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली. याचबरोबर राज्यातील सर्व नागरिक शेतकरी व युवकांना त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.




