Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याकांद्यानंतर आता केंद्र सरकारने या उत्पादनावर निर्यात शुल्क लागू केले

कांद्यानंतर आता केंद्र सरकारने या उत्पादनावर निर्यात शुल्क लागू केले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

केंद्र सरकारने उकड्या तांदळावर तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. सरकारने उकड्या तांदळावर म्हणजेच पारबॉईल्ड तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने बासमती तांदूळ आणि उकड्या तांदळाच्या निर्यातीवर नवी निर्बंध लागू केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाच्या निर्यातीला आळा बसणार आहे आणि याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. यामुळे देशातील तांदळाचा साठा वाढवण्यातही मदत होईल.

दरम्यान, केंद्र सरकारने उकड्या तांदळावर २० टक्के निर्यत शुल्क लागू केले आहे. तांदळाचा देशांतर्गत पुरेसा साठा राखणे आणि तांदळाचा देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचचले आहे. दरम्यान, २५ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेले हे निर्यात शुल्क १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या