Tuesday, March 25, 2025
Homeनगरकेंद्र सरकारच्या सुचनेनुसार जिल्ह्यात आरोग्य नमुना सर्वेक्षण

केंद्र सरकारच्या सुचनेनुसार जिल्ह्यात आरोग्य नमुना सर्वेक्षण

निवडक कुटुंबांची खर्च माहिती होणार संकलित

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शासकीय आणि खासगी रुग्णालय, दवाखान्यातून मिळणार्‍या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणार्‍या सुविधांची माहिती, घरातील लहान मुलापासून ते वयोवृध्द यांच्या आजार आणि त्यावर होणारा खर्च याविषयी माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यक्रमाअंतर्गत नगर जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती संकलित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

ही आरोग्य विषयक पाहणी जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निवडक गावांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात असणार्‍या जिल्हा सांख्यिकी विभाग आणि सरकारने ठरवून दिलेल्या सुत्रानुसार नमुना सर्वेक्षणासाठी कुटुंबाची निवड करण्यात येणार आहे. पाहणीत निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणार्‍या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येत आहे. या पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. नमुना तत्त्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील.

या सर्वेक्षणांतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब आणि मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. नगर जिल्ह्यात लवकरच सुरू होणार्‍या या पाहणी सर्वेक्षणात संबंधित कुटुंबीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुधीर कुलकर्णी यांनी केले आहे. दरम्यान, या पाहणीचा अहवाल हा गोपनिय ठेवण्यात येणार असून तो केवळ केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त
माहिती संकलित करणार्‍या अधिकारी – कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले असून, हे प्रशिक्षित कर्मचारी फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती संकलित करतील, असेही कळविण्यात आले आहे. हे काम जिल्हा सांख्यिकीक विभागात कार्यरत असणारे अन्वेशक करणार आहेत.

लवकरच आठवी आर्थिक गणना
केंद्र सरकारच्या सुचनेनूसार जिल्ह्यात लवकरच आठवी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बैठका झाल्या असून या आर्थिक गणनेबाबत प्राथमिक सुचना आलेल्या आहेत. याबाबत सविस्तर सुचना आणि मार्गदर्शन आल्यावर सरकारच्या आदेशानूसार नगर जिल्ह्यात आठवी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. यापूर्वीत सात आर्थिक गणना करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...