Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान; म्हणाले, ''भाजपने एकनाथ...

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान; म्हणाले, ”भाजपने एकनाथ शिंदेंना संदेश…”

मुंबई | Mumbai

सध्या महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. पंरतु, मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा आपल्या नावाचा विचार होंत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता याबाबत केंद्रीय्र राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “शिवसेना (शिंदे) पक्षाकडून महाराष्ट्रात (Maharashtra) बिहार पॅटर्न राबविण्याची मागणी केली जात आहे. मात्र बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवता येणार नाही. तसेच भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केले आहे. आमच्या जागा जास्त आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून शिदेंना देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता हे मान्य करावे आणि दिल्लीला यावे”, असे रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चांगले काम केले आहे, त्यांना केंद्रात आणा. जर त्यांनी ऐकलेच नाही तर भाजपाने शिवसेनेला बाजुला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे. शिंदेंनी अडीच वर्षे चांगले काम केले आहे. यामुळे त्यांनी केंद्रात यावे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री (CM) व्हायला हवे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...