Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCR Rail Updates: मुंबई पुण्यातील पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वेला फटका; 'या' गाड्यांच्या फेऱ्या...

CR Rail Updates: मुंबई पुण्यातील पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वेला फटका; ‘या’ गाड्यांच्या फेऱ्या रद्द

मुंबई | Mumbai
मुंबईसह पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेला बसला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. सतत पडणाऱ्या पावासमुळे मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या पावसामुळे आता अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे, जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी या गाड्यांचा समावेश आहे.

अचानक ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे तिकिट बुकिंग असलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, पुणेमार्गे जाणाऱ्या अनेक ट्रेन आज पुणे किंवा पनवेलपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

- Advertisement -

पावसामुळे रद्द झालेल्या गाड्या
11007 Deccan Express CSMT (मुंबई) → पुणे

YouTube video player

11008 Deccan Express पुणे → CSMT (मुंबई)

22105 Indrayani Express CSMT (मुंबई) → पुणे

22106 Indrayani Express पुणे → CSMT (मुंबई)

22122 Jhelum Express (short distance cancelled segment) पुणे → CSMT (मुंबई)

20705 Jalna – Mumbai CSMT Jan Shatabdi Express जालना → CSMT (मुंबई)

11011 Dhule – Mumbai CSMT Express धुळे → CSMT (मुंबई)

11012 Mumbai CSMT – Dhule Express CSMT (मुंबई) → धुळे

Short Originating (पुणे/पनवेल येथून पुढे सुरू होणाऱ्या) गाड्या
16339 CSMT – Nagercoil Pune – 00:20 (20.08.25)

12115 CSMT – Hospet Pune – 01:20 (20.08.25)

12115 CSMT – Solapur Pune – 02:20 (20.08.25)

22115 CSMT – Manmad Igatpuri – 20:47 (20.08.25)

20111 CSMT – Madgaon Panvel – 00:25 (20.08.25)

12112 CSMT – Amravati Nashik Road – 00:02 (20.08.25)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘नियोजन’ च्या 756 कोटी 43 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 756 कोटी 43 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे....